हार्दिक स्वागत...
संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब व खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे सर यांच्या शुभाशीर्वादाने, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे सर व कार्याध्यक्ष श्री. रामहरी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली, कु. विनायक विलास जरांडे यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना, शासकीय रुग्णालये, रक्तपेढ्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, रुग्णवाहिका तसेच इतर महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.