रुग्णसेवेची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब, खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब, आमदार मा. राजेश क्षीरसागर साहेब, खासदार मा. धैर्यशील माने साहेब, आमदार मा. चंद्रदीप नरके साहेब, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मा. मंगेश चिवटे सर आणि कार्याध्यक्ष मा. रामहरी राऊत सर यांचे मनःपूर्वक आभार.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत मिळवून देणे, शासकीय आरोग्य योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, रुग्णालये व ट्रस्टशी समन्वय साधणे, रुग्णालयीन बिलांमध्ये सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिरांमध्ये सहभाग घेणे आणि आरोग्यविषयक उपयुक्त माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्याचा प्रयत्न केला.
या सेवाकार्याची वरिष्ठांनी दखल घेऊन “नवरत्न पुरस्कार” जाहीर केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. हा सन्मान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून अधिक जोमाने रुग्णसेवा करण्याची प्रेरणा आहे.
हि सेवा केवळ सामाजिक कार्य नसून माझ्यासाठी एक आध्यात्मिक समाधान आहे. सेवा हि निरपेक्ष भावनेने, कोणताही हिशोब न ठेवता करायची असते तरीही रुग्णसेवक तथा माजी जिल्हाप्रमुख, कोल्हापूर म्हणून पार पाडलेल्या कार्याचा उपलब्ध लेखा-जोखा या अहवालाच्या माध्यमातून मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
आरोग्यदूत श्री. मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत शेकडो गरीब गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मार्गदर्शन, सहकार्य व पाठपुरावा करून रुपये 77,12,000 पेक्षा जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.
पत्रव्यवहाराची जबाबदारी सांभाळत असताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्यभरातील पदाधीकाऱ्यांना तत्काळ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी आरोग्यदूत श्री. मंगेश चिवटे सर याचे शिफारस पत्र उपलब्ध करून देऊन रुपये 38,42,324 पेक्षा जास्त रक्कमेची हॉस्पिटलच्या बिलामध्ये सवलत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी आरोग्यदूत श्री. मंगेश चिवटे सर याचे बिलात सवलतीचे शिफारस पत्राच्या माध्यमातून थेट रुग्णांना रुपये 11,20,611 पेक्षा जास्त रक्कमेची हॉस्पिटलच्या बिलामध्ये सवलत मिळवून देण्यात आली.
सिद्धिविनायक ट्रस्ट च्या माध्यमातून गरीब गरजू रुग्णांना मार्गदर्शन, सहकार्य आणि पाठ्यपुराव्याच्या माध्यमातून रुपये 2,00,000 पेक्षा जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत असताना अनेक आरोग्य शिबिर आयोजित करून हजारो नागरीकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्यात आला होता.
३० व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्वतः सह ३०० नागरिकांचे अवयवदान संकल्प फॉर्म भरून घेण्यात आले. या माध्यमातून समाजामध्ये अवयवदानबाबत जनजागृती निर्माण करणे, अधिकाधिक नगरिकांना अवयवदानसाठी प्रेरित करणे आणि गरजू रुग्णांना नवजीवन मिळवून देण्याचा संदेश देण्यात आला.
वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी आहे. अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही अनेकांना नवजीवन देण्याचा सर्वोच्च मानवतावादी संकल्प आहे.
समाजसेवेच्या भावनेतून आजपर्यंत अनेक वेळा स्वेच्छेने रक्तदान करण्याचे सौभाग्य लाभले आहे.
प्रत्येक रक्तदान ही एखाद्या गरजू रुग्णाला जीवनाची नवी आशा देण्याची संधी असते. नियमित रक्तदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि अधिकाधिक नागरीकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
रुग्णसेवेच्या कार्यात वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करणारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख तथा आरोग्यदूत श्री. मंगेश चिवटे सर, कार्याध्यक्ष श्री. रामहरी राऊत सर आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री. प्रशांत साळुंखे सर तसेच सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, कोल्हापूरचे समाजसेवा अधीक्षक श्री. लक्ष्मण मोरे सर यांचे वेळोवेळी लाभलेले सहकार्याबद्दल आभार.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, कोल्हापूरचे जिल्हा समन्वयक डॉ. रेणुका वडुलेकर व डॉ. रोहित खोलखंबे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
आरोग्यविषयक आवश्यक माहिती उपलब्ध करून देणारे कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद प्रशासनातील सर्व अधिकारी, तसेच रुग्णसेवेच्या कार्यात सदैव सहकार्य करणारे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सहकारी आणि सर्व ज्ञात-अज्ञात शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार.
आपले सहकार्य, मार्गदर्शन आणि विश्वास हीच पुढील सेवाकार्याची प्रेरणा आहे.